जगभरातून अजंठा एलोरा लेणी पाहण्यासाठी पर्यटक औरंगाबादला येतात.औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी असून आमचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही.त्यांच्या नावाचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये.असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
शांतता अहिंसा प्रज्ञा शील करुणा सत्य या बौद्ध संस्कृतीच्या तत्वांचा प्रतीक अजंठा एलोरा हे जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या बौद्ध लेणींचे नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने औरंगाबद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव संमत केल्याची माहिती पुढे आल्यानंतर रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही मात्र औरंगाबादमध्ये बौद्ध संस्कृतीच्या जागतिक स्तरावर नावलौकिक असणाऱ्या अजंठा आणि एलोरा या लेणी आहेत.अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृतीच्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी असल्याचे स्पष्ट केले आहे.