महविकास आघाडी सरकार मधील गृहमंत्री यांच्या १०० कोटीच्या वसुली विरोधात राज्यभर भारतीय जनता पार्टी कडून जोरदार आंदोलन करण्यात आले. संभाजीनगर येथील वसंतराव नाईक चौक येथे मा.आ.श्री.अतुल जी सावे साहेब, मा.खा.श्री. भागवत कराड साहेब, मा.श्री.संजय जी केणेकर साहेब यांच्या नेतृत्वात महाभकास आघाडी सरकार च्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी, आघाडी मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अतुल जी सावे साहेब यांनी भ्रष्टाचारी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व खुर्ची खाली करावी अशी मागणी केली. औरंगाबाद जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी शिवसेना व राष्ट्रवादी दोन्ही पक्षावर जोरदार ठीका केली.
श्रीकांत घुले औरंगाबाद शहर जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा यांनी महाविकासआघाडी सरकारला महावसुली सरकार असे म्हणून जोरदार हल्ला चढवला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ अनिल देशमुखांचा राजीनामा घाव्या अन्यथा हाकलून द्यावं अशी मागणी केली.