दख्खनचा ताज अशी ओळख असलेल्या औरंगाबादच्या बिबी का मकबऱ्याला आजपासून तुम्ही भेट देऊ शकता. कारण, आजपासून बिबी का मकबरा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकटाच्या सावटामुळे जगप्रसिद्ध बीबी का मकबरा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, काही प्रमाणात कोरोनाचे सावट कमी झाल्याने पुन्हा एकदा बिबी का मकबारा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय.
आज पहिलाच दिवस असून पहिल्याच दिवशी अनेक पर्यटकांनी मकबऱ्याला भेट दिली. कोरोना पार्श्वभूमीवर मकबऱ्यातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, कर्मचाऱ्यांना पीपीइ किटही देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांकडे थर्मल गन देण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराजवळ सॅनीटायझर ही ठेवण्यात आले आहे. पूर्ण काळजी घेऊनच प्रशासनाने पर्यटकांना बिबी का मकबरा पाहण्यासाठी प्रवेश दिला जात आहे.
आजपासून मकबरा पर्यटकांसाठी खुला झाला आहे. येणाऱ्या काळात पर्यटकांची गर्दी पुन्हा बिबी का मकबरा अनुभवेल आणि सगळं सुरळीत होईल असा विश्वास पर्यटकांकडून ‘वर्तमान’ सोबत बोलतांना व्यक्त केला जात आहे.