जागतिक कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता. राज्यात चिंताजनक परिस्थिती आहे. त्यातच खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. खाजगी रुग्णालयात मनमानी पद्धतीने भरमसाट बिलांची वसुली केली जात आहे. त्या वसुलीला थांबवण्यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आदेश काढले आहेत.
कायद्यापेक्षा मोठा कुणी नाही असे म्हणत कायदेशीर कारवाई करणार असल्याचा दम जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खाजगी रुग्णालयांना दिला आहे. डॉक्टरांना देव म्हणणाऱ्या आपल्या देशामध्ये फक्त स्वार्थासाठी रुग्णालयांनी जास्त बिल आकारणे, ही लाजिरवाणी बाब असून अश्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही. असे जिल्हाधिकारी म्हणाले.
प्रत्येक खाजगी रुग्णालयातील प्रत्येक बिलांचे ऑडिट केलं जाणार आहे. त्यामुळे आता रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. रोज रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाला सदरील फॉरमॅट मध्ये माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आतापर्यंत जास्त बिल आकारणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करत 2495995 एवढी रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्यात आली आहे. त्यामुळे आता खाजगी रुग्णालयामधील आर्थिक लुटीला मोठा चाप बसणार आहे.