औरंगाबाद : बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयांनी सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

6

कोविड-19 संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रुग्णालयांनी सज्ज राहण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात बालकोविड संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत बालरोग तज्ञांसमवेतच्या आढावा बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हयात संभाव्य तिसऱ्या लाटेतील संसर्गात 0 ते 18 वर्षाखालील वयोगटातील सर्व बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवत हा संसर्ग पूर्णत: रोखण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालय, सर्व बालरोगतज्ञ, वैद्यकीय तज्ञ आणि आरोग्य यंत्रणा यांनी सर्तक रहावे असे सूचित चव्हाण यांनी केले.

घाटी, मनपा, जिल्हा रुग्णालयासोबत सर्व खाजगी रुग्णालयांनी समन्वयपूर्वक संसर्गापासून वेळीच बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, वाढीव आवश्यक उपचार सुविधा, औषधसाठा यासह इतर सर्व बाबीचे पूर्वनियोजन प्रभावीपणे करावे. तसेच वाढीव प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळ, खाटांची उपलब्धता सज्ज ठेवावी.
घाटीने बालरोगतज्ञ, नर्स यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत. तसेच आवश्यकतेनुसार मिल्क बँक सुविधा तयार ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.