औरंगाबाद : शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची कोरोनाविरुद्ध मी जबाबदार मोहीम

12

गंगापूर तालुक्यातील रांजणगाव, एकलहेरा, आंबेगाव, खडकनारळा येथे मी जबाबदार कोविड जणजागृती संवाद दौरा सकाळच्या सत्रात शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी शिवसेना पदाधिकारी, आरोग्य अधिकारी, मंडळ अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तलाठी, आशा सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.

कोविड १९ मी जबाबदार जनजागृती संवाद दौऱ्यात संध्याकाळी शहरातील विश्रांतीनगर, पुंडलिकनगर भागात आयोजित केला होता. औरंगाबाद शहारात कोविड परीस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, यामुळे नागरीकांनी स्वतः पुढे येत लसीकरण करून घ्यावे.

महापालिकेने यासाठी वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू केले आहे. तसेच शासनाच्या Break the Chain या नवीन नियमावली पालन करावे, यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक वार्डनिहाय टिम तयार करुन वार्डातील प्रत्येकी घरी जाऊन लसीकरण, कोविड विषयी जनजागृती करावी. असे आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे.