शिल्लेगाव पोलिसांची सावंगी चौकात कारवाई.
संजय शर्मा लासुर स्टेशन प्रतिनिधी
गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे सावंगी चौकात दुपारी तीन वाजेच्या सुमारास टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो क्रं.एम.एच.15 बी.जे.3245 हा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथून शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासुर स्टेशन मार्गे अहमदनगरकडे रेशनचा अवैध तांदळासह गहू घेऊन लासुर मार्गे जात असल्याची गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळाली होती त्यामुळे शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे यांनी सापळा रचून सदरील टेम्पो सावंगी चौकात येतांच पकडला असता त्यात पुढील बाजूस तांदूळ तर पाठीमागच्या बाजूस इतर धान्य मिळून आले असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या तांदूळ व गहू बाबत सदर वाहनातील चालकाकडे विचारणा केली असता तांदुळ व गहू मालकी हक्काचा कुठलाही पुरावा सदर चालकाकडे मिळून आला नाही म्हणून सदर टेम्पो टाटा 407 वाहन हे शिल्लेगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून त्या वाहनात अंदाजे किती गहू व तांदूळ आहे यांची माहिती पोलिसांकडून वृत्त लिहिपर्यन्त अधिकृतरित्या मिळाली नाही.