एकीकडे कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर जग मेटाकुटीला आले असतानाच केंद्र सरकारने या वर्षी खताची प्रचंड भाववाढ केली असून ती निषेधार्ह आहे. रासायनिक खतांची भाववाढ ही शेतकऱ्याना संपणारी आहे.
कोविडच्या काळात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमालाला योग्य भाव नाही, अवकाळी पाऊस, पेट्रोल-डिझेल ची प्रचंड दर वाढ यावेळी शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आला आहे.
केंद्र सरकारच्या या तुघलकी निर्णयाचा निषेध म्हणून आज विभाकीय आयुक्त कार्यालय येथे निदर्शने करण्यात आले यावेळी कैलास पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाऊसाहेब तरमळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जिमलसिंग रंधाव, शरद पवार, विशाल शेळके, मयूर अंधारे, प्रवीण म्हस्के यांची उपस्थिती होती.