औरंगाबाद जिल्ह्यासाठी दुर्दैवी बातमी आहे. औरंगाबाद जिल्हा देशात कोरोना बधितांच्या रूग्नसंख्येत ६ व्या क्रमांकावर आला आहे. राज्यात कोरोना महामारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे, त्याचा फटका औरंगाबाद जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे.
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांमध्ये पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात औरंगाबाद ६ व्या स्थानी आहे. त्यामुळे मराठवाडयातील नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दरदिवशी हजार ते दीड हजार दरम्यान रुग्णांची भर पडत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खाटा अपुऱ्या पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेपुढे मोठं संकट निर्माण झालं आहे.
काल औरंगाबादेत एकूण ७०,५५१ इतके रुग्ण होते. त्यातील १२,९४९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये हा आकडा झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे औरंगाबाद प्रशासनाने नागरिकांना मस्कचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.