ओळखीच्या बेरोजगार तरुणीला मुंबईत नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवून सदरील तरुणीवर नराधमाने जीवे मारण्याची धमकी देत कारमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेबुब इब्राहिम शेख रा. शिरूर जि. बीड असे सदरील आरोपीचे नाव आहे. पिडीत तरुणीचे बिए डी एड असे शिक्षण झालेले आहे. पण ती बेरोजगार असल्याने तिला मुंबईत नोकरी लाऊन देण्याचे आश्वासन आरोपी महेबुब शेख याने दिले. ओळख वाढत गेल्यानंतर आरोपीने तरुणीला निरजनस्थळी नेऊन कारमध्ये बलात्कार केला.
पिडीत तरुणीने अत्याचार झाल्यानंतर सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि झालेला वृत्तांत पोलिसांसमोर सांगितला. त्यावरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.