औरंगाबाद नामांतर : ‘दानवेंनी फेकाफेकी करू नये’,शिवसेना नेता कडाडला

75

औरंगाबाद नामांतराचा वाद चांगलाच पेटलेला आहे. औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. या मागणीला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.

नामांतरावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच आता रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना आमच्यासोबत पाच वर्ष सत्तेत होती, तेव्हा कधी फडणवीसांकडे औरंगाबादचे संभाजीनगर करा, अशी मागणी केली होती का? असा प्रश्न रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला विचारला आहे.

संभाजीनगर नावाला आमचं समर्थन आहे. संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेस विरोध करत असेल तर आता शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

रावसाहेब दानवे यांच्या टीकेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे यांनी व्यवस्थीत माहिती घ्यावी, फेकाफेकी करू नये, मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासंदर्भात चार पत्रे लिहली होती, असा दावा खैरे यांनी केला आहे.