औरंगाबाद : शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण

16

औरंगाबाद मध्यचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना कोरोनाची लागन झाली आहे. संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रदीप जैस्वाल यांनी केलं आहे.

आमदार प्रदीप जैस्वाल हे सार्वजनिक कार्यक्रमात कायम उपस्थित राहत असतात.  त्यांनी सोशल मिडीयावर कोरोना झाल्यासंबंधी माहिती दिलीय.

शिवसेनेच्या जिल्ह्यातील कार्यक्रमांना शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते सुद्धा उपस्थित राहत होते. आमदार प्रदील जैस्वाल यांना कोरोनाची लागन झाल्यामुळे आता या सर्व नेत्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन जैस्वाल यांनी केले आहे.

गेल्या वर्षभरात कोरोना वैश्विक महामरिने जगाला हैराण केले आहे. मात्र आता कोरोनाची लढाई अंतीम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. लस असली तरीहीर मास्कचा वापर आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.