औरंगाबाद: जिल्हा रुग्णालयात अजब प्रकार; कोरोना रुग्णाचा रुग्णालयातील शौचालयात गुदमरून मृत्यू

48

औरंगाबाद शहरात एका कोरोना रुग्णाचा शासकीय जिल्हा रुग्णलयाच्या शौचालयात गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदरील रुग्णाचे नाव गुलाबराव ढवळे असे आहे.  हा रुग्ण तब्बल साडेचार तास शौचालयांमध्ये पडून होता. आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

सदरील रुग्णाचा शौचालयात जाऊन मृत्यू झाल्यानंतर तब्बल साडेचार तास जिल्हा रुग्णालयाने या रुग्णाकडे लक्ष न दिल्यामुळे औरंगाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होते. दुर्लक्ष होतं असे रुग्णांचे अनुभव आहेत. जागतिक कोरोना संकटात तरी जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाने प्रामाणिक काम करणे गरजेचे असल्याचं सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

सदरील रुग्ण रात्रीच्या सुमारास शौचालयात गेला होता. हा रुग्ण चक्कर येऊन शौचालयात पडला त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. तब्बल साडेचार तास रुग्ण परत न आल्यामुळे इतर रुग्णांनी तक्रार केल्यामुळे, शौचालयात जाऊन पाहिले असता दार बंद होतं. त्यानंतर दरवाजा तोडला असता रुग्ण हा बेशुद्धावस्थेत पडल्याचे समोर आले. त्यानंतर रुग्णाला तपासला असता त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.