अधिवेशनात विरोधक फाडून खातील, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटतेय : निलेश राणे

2

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं रोज येणाऱ्या आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे. पण भाजपकडून मात्र सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

अधिवेशन तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी ते टाळण्यासाठी कोरोनाचं भांडवल करत आहेत. अधिवेशनात विरोधक फाडून खातील, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटतेय, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे .

सरकारमधील अनेक मंत्री कुठल्या तरी भानगडीत अडकले आहेत. त्यावर विरोधक फाडून खातील. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला ना मुख्यमंत्री समर्थ आहेत ना उपमुख्यमंत्री, अशा शब्दात निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे .

14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, विजयी मिरवणुका निघाल्या, त्याला गर्दी होती. आता लोकल ट्रेलचं कारण सांगत आहेत. लोकल काय आताच सुरु झाल्या का?. असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे .