निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे मैदानात उतरल्या होत्या. सर्दी, ताप आणि खोकला असल्याने पंकजा मुंडे या जबाबदारी स्वीकारत आयसोलेट झाल्या आहेत. अर्थाचे अनर्थ टाळत दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी अस पंकजा मुंडे म्हणाल्या.
राज्यातील पदवीधर आणि शिक्षण मतदार संघाचे आज मतदान होणार आहे. एक वर्ष पूर्ण झाल्याबाबद्दल मी सर्व प्रथम आघाडी सरकारचे अभिनंदन करते. जनतेने बहुमत दिले नसतानाही ते सत्तेत आहेत. जनहितासाठी आम्ही सहकार्याची भूमिका नक्कीच ठेऊ असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले आहे.
एक वर्ष पूर्ण होते की नाही या बाबतीत जनतेच्या मनात शंका होती. त्यामुळे सरकार टिकवणे हे त्यांचे ध्येय आहे असे मला वाटते. कोरोनाचा सामना करण सरकारपुढे आव्हानच आहे. सरकारसाठी हे नक्कीच त्रासदायक आहे. जनतेचे हित अशी दुय्यम परिस्थिती आहे असेही त्या म्हणाल्या. प्रचारानंतर सर्दी, ताप आणि खोकला यामुळे पंकजा मुंडे आत्ता स्वतः विलीगिकरनात गेल्या आहेत. त्यांनी रात्री उशिरा या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.