शेतकऱ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे शीख धार्मिक नेते आणि पर्यावरणवादी बाबा सेवा सिंह यांनी शुक्रवारी जाहीर केले.
या दिवशी लोकप्रिय गायक-अभिनेता हरभजन मान यांनी पंजाबच्या भाषा विभागाने जाहीर केलेला ‘शिरोमणि गायक’ पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले होते. २०१७ मध्ये ‘रानी तट ‘या पुस्तकासाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार (पंजाबी) जिंकणारा दुसरा लेखक हरमनजीत सिंग यांनी पण आपण पुरस्कार वापस करणार आहोत असे सांगीतले.
कार सेवा पंथाचे प्रमुख बाबा सेवा सिंह म्हणाले की, शेतकरी आकाशाखालील थंड रात्री धरणे लावून बसले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी संघटनांशी एकता व्यक्त करण्यासाठी यांनीही आपला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ मध्ये मला पर्यावरणाच्या योगदानाबद्दल मला पद्मश्री पुरस्कार परत देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत. नागरिकांना अमानुष वागणूक दिली जात असताना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होण्यास काहीच अर्थ नाही.