आज सहा डिसेंबर अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद आजच्या दिवशी पाडली गेली. त्यानंतर अनेक वाद झाले. आता वाद संपला आहे. न्यायालयाने निकाल दिला आहे. मंदिर उभारण्याची परवानगी देण्यात आली. लवकरच बाबरी मशिदीच्या ठिकाणी भव्य राम मंदिर उभारण्यात येणार आहे. मात्र, अजूनही अनेकांच्या मनातून हा विषय गेलेला नाही.
आजच्या दिवशी बाबरी मशीद पाडली गेली याच्या स्मृती अजूनही अनेकांच्या मनातून पुसल्या गेल्या नाहीत. कोर्टाच्या निकालानंतरही औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यानी आजच्या दिवसाला काळा दिवस म्हटले आहे. त्यांनी फेसबुकवर एक फोटो शेअर करत पोस्ट टाकली आहे. आणि काळा दिवस ! ‘सब याद रखा जायेगा’ असं म्हटलं आहे. त्यावर अनेक हिंदू मुस्लिम धर्मीय नागरिकांनी भडकाऊ कमेंट केल्या आहेत. काय याद ठेवणार असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शेअर केलेल्या फोटोत एक डोळा असून त्यात बाबरी मशिदीचा फोटो आहे. आणि सोबत काळा दिवस सब याद रखा जायेगा’ असं त्यांनी म्हटलं आहे. एक लोकनियुक्त खासदार अशी चिथावणीखोर भाषा वापरत आहे. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.