दानवेंना घरात घुसून मारावं लागणार : बच्चू कडू

22

सध्या एकीकडे देशात किसान आंदोलन सुरू आहे. देशभरात किसान आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय. तर, दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक वक्तव्य केलंय. शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचं वादग्रस्त वक्तव्य दानवे यांनी केलंय. त्यामुळे दानवे यांच्यावर चहूबाजूने टीकेची झोड उठली आहे.

दानवे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यमंत्री बाच्चू कडू यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या दानवेंच्या घरापर्यंत आम्ही याआधी गेलो होतो, आता घरात घुसून मारावे लागेल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर दानवेंचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी आहे याचा तपास करणे गरजेचे आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, केंद्राच्या तीन कृषी विधेयक विरोधात देशात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू मोटारसायकलवर दिल्लीकडे रवाना झाले आहेत.