महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना वाढण्यास स्थलांतरित जबाबदार असल्याचं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “बहिरा नाचे आपन ताल!” म्हणजे “बहिरी व्यक्ती स्वतःच्याच तालावर नाचते” अशी टीका निरुपम यांनी केली आहे.
मुंबईतील वाढत्या समस्यांना परप्रांतीय जबाबदार असल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायमच करत असतात. परप्रांतीय लोकांविरुद्ध मनसेचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. परप्रांतीय लोकांमुळे मुंबईतील मराठी लोकांचे हाल होतात असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परप्रांतीयांसोबत उभे राहिले आहेत. कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतीयविरोधी सूर आळवल्याने निरुपम यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये परप्रांतीय मजूर मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जात असताना राज ठाकरेंनी त्यांना परत घेताना मोजणी आणि चाचणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.