कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून महाविकास आघाडी सरकार, संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
उभ्या उभ्या मी बोलत नाही. अजितदादा झोपेत सरकार तुम्हीच आणलं. शरद पवार हेही त्यावेळी झोपेत होते’ असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जरा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर शांतपणे बसावं आणि डोळे मिटावे आणि विचारावं तुमचं ही मत असं आहे का? तर बाळासाहेब ठाकरे हे वरतून थोबाडीत मारतील’ अशी विखारी टीका देखील त्यांनी केली.
तसेच खासदार संभाजीराजे हे मराठा आरक्षणासाठी योग्य भूमिका घेत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा आहे’, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.