बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला

15

महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरु आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची परस्पर घोषणा केल्याने त्यात आणखी भर पडली होती.

महाविकास आघाडीतील दुरावे पाहता आज काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवारांची भेट घेतली आहे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, संभाजी राजेंनी गेल्या आठवड्याभरात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.

शरद पवारांच्या निवासस्थानी जात काँग्रेस नेते थोरात यांनी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. यामध्ये काय बोलणे झाले, याची माहिती देण्यात आली नाही. परंतू ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले गेले.