आर्थिक बजेट वरून बाळासाहेब थोरतांची केंद्र सरकारवर टिका

8

अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेट नंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.सामान्य लोकांच्या हातात पैसे आणण्याऐवजी मोदी सरकारने देशाची मालमत्ता त्यांच्या उन्मत्त भांडवलदार मित्रांच्या हातात सोपवण्याचा कट आखला आहे.कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बजेटवर टीका करताना म्हटले आहे.

अर्थमंत्र्यांचे आजचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकून, हा निवडणुकीचा जाहीरनामा होता की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र, हाच प्रश्न पडला आहे.जिथे निवडणुका नाहीत त्या राज्याला काही द्यायचे नाही हे केंद्राचे धोरण असल्याचे या अर्थसंकल्पातून समोर आले आहे. या सरकारने अर्थसंकल्पाला निवडणूक जाहीरनामा बनवले आहे. अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

तसेच जीएसटीचे अवाजवी दर सरकार कमी करेल अशी अपेक्षा होती, मात्र त्या दरातही सरकारने कपात केली नाही. ही सर्वसामान्य गरिबांची मोठी फसवणूक आहे. यामुळे महागाई वाढतच जाणार आहे.नियोजनशून्यरित्या लावलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. असेही थोरात म्हणाले आहेत.

राज्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील या बजेटवर टीका करत म्हटले की, ”अर्थमंत्र्यांचे आजचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकून, हा निवडणुकीचा जाहीरनामा होता की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र, हाच प्रश्न पडला आहे”.

आज सकाळी 11 वाजल्यापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या सादरीकरणास सुरवात केली. ‘आत्मनिर्भर भारतासाठी बजेट’ असं या बजेटचं वर्णन अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.