‘बालिका वधू’ फेम अविका गोरने दिली प्रेमाची कबुली

2

गेल्या काही दिवसांपासून ‘बालिका वधू’ फेम अविका गोर खुप चर्चेत आहे. बालिका वधू या मालिकेतुन ती घराघरात पोहोचली होती तिने या मालिकेत बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. अविकाने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या लूकमुळे आणि मेकओव्हरमुळे चर्चेत होती. आता ती तिच्या लव्हलीईफमुळे चर्चेत आहे. सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात तिचे चाहते आहेत.

अविकाने आपल्या बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. रोडीज फेम मिलिंद चंदवानी याच्या सोबत दोन फोटो शेअर करून तिने प्रेमाची कबुली दिली. या फोटोवर कमेंटचा आणि लाईक्सचा वर्षाव झाला आहे. ते गोव्या मध्ये एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. ती दोघेही समृद्र किनारी रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. चाहत्यांनी तिचे अभिनंदन देखील केले आहे.

तिने फोटो पोस्ट करून, कॅपशनमध्ये लिहले आहे की, माझ्या आयुष्यातील प्रेम मला मिळाल आहे. माझं जग पूर्ण करण्यासाठी मनापासून आभार. हि दयाळू व्यक्ती माझी आहे आणि मी कायमस्वरूपी त्याची आहे. तिने या पोस्टमध्ये मिलिंदबद्दल खूप काही लिहत त्याचे कौतुक केले आहे.