रक्तसाठा तुटवड्य‍ाच्या पार्श्वभूमिवर बाळसमुद्र प्रतिष्ठानच्यावतीने वाशिममध्ये भव्य रक्तदान शिबीर संपन्न

22

प्रतिनिधी – अजिंक्य जवळेकर

सध्या वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. या पार्श्चभूमिवरच वाशिम शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या बाळसमुद्र प्रतिष्ठानने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरामध्ये एकुण ५३ युवकांनी रक्तदान करीत आपले सामाजिक दायित्व निभावले आहे.

बाळसमुद्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तथा युवा समाजसेवक नितीन ऊचीतकर व अंकित व्यवहारे यांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधून या भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी विभागाच्यावतीने जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनास प्रतिसाद देत बाळसमुद्र प्रतिष्ठानने या शिबीराचे आयोजन केले होते.

यावेळी वाशिम शहरातील ५३ युवकांनी पुढे येत रक्तदान केले. संपूर्ण शिबीराची व्यवस्थापकीय जवाबदारी पप्पु भाऊ व्यवहारे यांनी पार पाडली. तसेच या शिबीरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी विभाग वाशिम, मनसे वाशिम शहर, राष्ट्रीय सेवा योजना गोटे कॉलेजचे स्वयंसेवक यांचे विशेष सहकार्य लाभले होते. कोरोनासंबंद्धित सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत हे रक्तदान शिबीर संपन्न झाले आहे.