नविन वर्ष सुरू होऊन जानेवारी महिना आता संपत आहे. पुढच्या महिन्यात अनेक आर्थिक बदल होणार असून बँकांसंबंधी ही बातमी महत्त्वाची आहे. फेब्रुवारीमध्ये बँकेत जाण्याआधी बँक बंद तर असणार नाही ना हे एकदा चेक करावे लागेल असा अंदाज आहे.
यंदाचा फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असल्यामुळे त्यापैकी 7-8 दिवस बँका बंद असणार आहेत. यामुळे बँकेची कामे तुमच्या वेळेनुसार नाही तर बँकांच्या कामकाजाच्या दिवसांनुसार उरकावी लागणार आहेत. मणिपूर,मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपणार आहे. 1 फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
फेब्रुवारीमध्ये ज्या बँकांना सुट्ट्या मिळणार आहेत त्या राज्यांनुसार वेगवेगळ्य़ा असणार आहेत. 12 फेब्रुवारीला सिक्किमच्या बँकांना सुट्ट्या असणार आहेत. या दिवशी तिथे सोनम लोसार आहे. तर 13 फेब्रुवारीला महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सर्वच ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. 15 फेब्रुवारीला मणिपूरमध्ये बँका बंद असणार आहेत. स्थानिक सण असल्याने तेथील बँका बंद असतील.
आरबीआयचं म्हणणं आहे की, राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या बदलू शकतात. म्हणूनच, सर्व ग्राहकांनी हे लक्षात घेऊन बँकिंगशी संबंधित त्यांच्या कामाची योजना आखली पाहिजे. यंदाचे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांची पर्वणीच घेऊन आले आहे. 1 फेब्रुवारीला बजेट सादर होईल. मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपेल. भारतीय रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या वर्षभराच्या सुट्ट्यांमध्ये जवळपास 40 दिवस बँका बंद राहणार आहेत.