शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना काल ईडीने नोटीस पाठवली आहे. यामुळे सर्व शिवसैनिक पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पुन्हा एकदा मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी आता मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले आहेत. या बॅनर्सचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.
भाजपचा पोपट असला तरी मी ईडीचा आदर करतो, असा टोलाही संजय राऊतांनी यावेळी लगावला आहे. शिवसैनिकांनी हा बॅनर लावल्याचे लक्षात आल्यानंतर काही पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहचले. मात्र तुम्हाला हा बॅनर काढता येणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा असं शिवसैनिकांनी पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी नंतर हा बॅनर खाली उतरवला आहे.