बारामती पोलिसांकडे आहे ‘हा’ कलम आत्ता त्यांना घाबरायचं बर का ??

10

काल बारामतीत पोलीस कर्मचारी एका दुचाकीस्वाराला अडवून मारहाण करतानाचा व्हिडीओ एका प्रसिध्द वृत्तवाहिणीचा पत्रकार घेत होता. तेव्हा आमच्या परवानगी शिवाय व्हिडीओ घेतलाच कसा असा प्रश्न विचारत त्या पत्रकाराला गाडीत बसवून त्याच्या वर 353 चा कलम लावतो अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे .

बारामतीतील भिगवण चौकात हा प्रकार घडला आहे. आत्तापर्यंत सामान्य लोक पोलीस कर्मचाऱ्यांविषयी अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त करत होते,मात्र राजकीय नेत्यांना मी हिसका दाखवतो तुम्ही पत्रकार काय चीज रे ?? असा म्हणणारा पोलीस कर्मचारी काल बारामतीत पाहायला मिळाला.

दरम्यान या संदर्भात पत्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कानावरही हा प्रकार घालणार आहे .

कालच्या घटनेने बारामतीचे पोलीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या अवास्तव संरक्षनाच्या पडद्याआड पत्रकारांवर कशापद्धतीने अरेरावी करतात याचा प्रत्यय आला.