बारामतीतील पोलीस कर्मचाऱ्याचा खोकल्याचे औषध समजून किटकनाशकाचे सेवन केल्याने मृत्यू

9

खोकल्याचे औषध समजून किटकनाशकाचे सेवन केल्याने बारामती येथील तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी पोपट विष्णू दराडे (वय 45, रा. अकोले, ता. इंदापूर) यांचा आज दुर्देवी मृत्यू झाला.

पोपट दराडे हे आपली डयूटी संपवून घरी गेल्यानंतर त्यांना खोकल्याचा त्रास होत होता म्हणून त्यांनी खोकल्याचे औषध समजून घाईत शेतात फवारणी करण्याचे किटकनाशक सेवन केले. त्या नंतर काही क्षणातच त्यांना आपली चूक लक्षात आली. 

त्यांनी पुणे शहर, देहू रोड, इंदापूर, बारामती शहर व बारामती तालुका पोलिस ठाण्यात काम केले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या सहका-यांनाही आज कमालीचा धक्का बसला.

बारामती तालुका पोलिस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आल्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.