बारामती शहर पोलिसांनी अमृतसर (पंजाब) येथून विक्रीसाठी आणलेल्या तलवारी जप्त केल्या आहेत. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा, मुंबई पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानुसार पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, सपोनि प्रकाश वाघमारे, निकम, अकबर शेख, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, अतुल जाधव, होमगार्ड साळुंके यांनी बांदलवाडीत निरा डावा कालव्यालगत सापळा रचला.
नितीन मल्हारी खोमणे (वय 25, रा. पिंपळी, ता. बारामती) या सराईताकडून 20 तलवारींसह एक गावठी पिस्तुल जप्त केले. एकाच वेळी 20 तलवारी जप्त केल्याची पुणे ग्रामीणमधील ही सर्वात मोठी कारवाई आहे.