बारामतीत काल विक्रमी तपासण्या झाल्या. शासकीय व खाजगी मिळून 732 नमुने तपासले गेले. त्यापैकी 171 जण पॉझिटीव्ह आढळले. मध्यवर्ती ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध झाल्याने बारामतीकरांनी या बाबत समाधान व्यक्त केले.
अचानकच आज सकाळी बाजारपेठ बंद ठेवण्याचा फतवा आल्यानंतर बारामती व्यापारी महासंघाने या निर्णयाला कडाडून विरोधकेला. तब्बल 25 दिवस दुकाने बंद ठेवणे आता व्यापा-यांना परवडणारे नसल्याची भावना व्यापा-यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
अत्यावश्यक सेवा वगळता येत्या 30 एप्रिल पर्यंत बारामती शहर व तालुका बंद ठेवण्याचा आज निर्णय घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी या बाबत माहिती दिली.
यावेळी नरेंद्र गुजराथी, नरेंद्र मोता, संदीप मुंबईकर, प्रमोद खटावकर, जगदीश पंजाबी, विवेक पांडकर, प्रवीण आहुजा, सुशील सोमाणी, संजय सोमाणी, चेतन व्होरा, परेश वीरकर आदी उपस्थित होते.