पुणे जिल्ह्यात बारामतीत सर्वाधिक चाचण्या होत असून त्या मुळे रुग्णांची संख्याही बारामतीतच अधिक असल्याचे चित्र आहे. बारामतीत एल एकाच दिवसात 687 रुग्णांचे नमुने तपासले गेले.
कोरोनाने आता बारामतीत अक्षरशः हैदोस घालण्यास प्रारंभ केला आहे. काल प्रतिक्षेत असलेल्या 234 नमुन्यांपैकी बारामतीतील 64 जण पॉझिटीव्ह आढळले. दरम्यान काल तपासलेल्या नमुन्यांपैकी तब्बल 149 जण पॉझिटीव्ह आहेत. कालच्या एकाच दिवसातील आकडा हा 213 झाला आहे.
ज्या रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत मात्र ज्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, ज्यांच्याकडे स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी द्यायला हवी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
उन्हाळा सुरु झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात रुग्ण संख्येचा आकडा आज दोनशेचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. अनेक रुग्णालय हाऊसफुल्ल असून पुढील काही दिवसात व्हेंटीलेटर्सची कमतरता भासू शकते अशी स्थिती आहे.