बारामतीत प्लाझ्माची सुविधा उपलब्ध नसल्याने इंदापूरला जाऊन प्लाझ्मा दान करावे लागत आहे.प्लाझ्मा देण्यामुळे अनेकांचा जीव वाचू शकत असल्याने बारामतीकरांनी आता या बाबत पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते चंद्रवदन शहा (मुंबईकर )यांनी केले आहे.
त्यांनी दिलेल्या प्लाझ्मा बारामती तालुक्यातील एका गंभीर रुग्णाला काल देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती आता हळुहळू सुधारते आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी आयजीजी तपासणी आवश्यक आहे.
ज्याला कोविड होऊन गेला आहे, असे रुग्ण कोविड निदानाच्या तारखेपासून 28 दिवस पूर्ण झाल्यावर कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असेल तर 90 दिवसांच्या आत दोन वेळा प्लाझ्मा दान करु शकतात.
बारामतीत दररोज किमान बारा बॅग प्लाझ्माची सध्याची मागणी आहे, मात्र बाहेरगावाहून यातायात करुन या बॅग मिळवाव्या लागत आहेत.