भारतीय क्रिकेट रसिकांनी आयपीएलला अगदी डोक्यावर घेतले आहे. २००८ पासून सुरु झालेली हि स्पर्धा वर्षागणिक यशाची उंचच उंच शिखरे गाटत आहे. यामागे बिसिसियाची व्यवस्था, खेळाडूंची मेहनत व पेक्षांचे प्रेम खुप आहे. गत वर्षी कोरोनामुळे उशिरा व भारताबाहेर खेळवल्या गेलेल्या स्पर्धेलाही जगभरातील क्रिकेट रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
संयुक्त अरब अमिरात येथे आयोजित गतवर्षीच्या स्पर्धेचे विजेते ठरलेले मुंबई इंडियन्स व भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या रॉयाल चॉलेन्जेर बेंगलोर संघादरम्यान या वर्षीच्या मोसमाचा पाहिला सामना चेन्नई येथे रंगणार आहे. मुंबई, बेंगलोर सह स्पर्धेत चेन्नई, पंजाब, दिल्ली, कोलकाता, राजस्थान व हैदराबाद संघाचा सहभा आहे. सर्वच संघ एकमेकांस तुल्यबळ असल्यामुळे यंदाचेहि सामने दरवर्षीप्रमाणे मनोरंजक होतील अशी अशा आहे.
९ एप्रिल पासून सुरु होवून ३० मे ला संपणाऱ्या या हंगामाच्या आयपीएलचा संपूर्ण वेळापत्रक चेक करा…