महिनाभर दाढी कटिंग घरातच; सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

9

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. परिणामी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांमळे सलून व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सलूनचा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत.

३० एप्रिल पर्यंत व्यवसाय बंद राहणार असल्याने आता महिनाभर दाढी कटिंग घरातच करावी लागणार आहे. सुरक्षित अंतर राखलं जात नसल्याने पहिला फटका सलून व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. गेल्या वर्षभरात चढउतार पहावे लागल्याने सलून व्यवसाय संकटात सापडला होता. आता कुठे सुरळीत सुरुवात झाली होती.

आता पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा सलून व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. थकलेले दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार, थकलेले वीजबिल अशा सर्वच बाजूने सलून व्यावसायिक संकटात सापडले आहेत. पुन्हा सरकारने धंदे बंद ठेवून आमच्या जगण्याचा प्रश्न निर्माण केला असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं.