ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ वय 83 यांचे आज गुरुवारी सायंकाळी निधन झाले आहे. ‘झपाटलेला’ या मराठी चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ ची भूमिका साकारून नावारूपास आलेल्या या अभिनेत्याचे 83 व्या वर्षी निधन झाले आहे. कडकोळ हे मराठी अभिनेते आणि लेखक होते. त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, तसेच दूरचित्रवाहिनी मालिकांतून अभिनय केला आहे.
त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. राघवेंद्र यांनी ब्लक अँड व्हाईट, गौरी, सखी, कुठे शोधू मी तिला या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर छोडो कल की बात या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारली होती. बालगंधर्व परिवारतर्फे राघवेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
कृषणधवल चित्रपटापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तसंच नाटकांमध्ये त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यांच्यासोबतही काम केलं होतं. लहानपणी त्यांनी शिक्षण सोडून देशसेवा करण्याचा निश्चय केला होता. त्यासाठी नौदलात जाण्याची तयारीसुद्धा केली होती. तेव्हा भारताच्या आयएनएस विभागात ते एका पथकासोबत गेले होते. तेव्हा वैद्यकीय कारणांमुळे त्यांना बाहेर पडावे लागले होते.

बालगंधर्व परिवारतर्फे ज्येष्ठ नाटय-चित्रपट अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. कडकोळ यांनी ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘कुठे शोधू मी तिला, ‘गौरी’, ‘सखी’ या मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटात काम केले आहे. कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहीले आहे. चित्रपट, नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.