नेहमी चर्चेत असलेले सेलिब्रेटी कपल म्हणजे टीम इंडियाचा विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा. काही दिवसांपूर्वी दोघांना कन्यारत्न झाले. यांनी त्यांच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे.
विरुष्काची मुलगी नाव काय असेल याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचा पहिला फोटो देखील शेअर केला आहे. यासोबत मुलीचे नाव देखील सांगितले आहे. विरुष्काच्या चाहत्यांना मुलीचे नाव काय ठेवणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागली होती.
विराट आणि अनुष्काने मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे. याबाबतची इन्स्टाग्राम पोस्ट अनुष्का शर्माने केली आहे. ‘आम्ही प्रेम, जिव्हाळ्याने आमचं आयुष्य जगत आलो आङोत. पण या छोट्या वामिकाने आमच्या जगण्याला वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. अश्रू, हसणं, भावना या सगळ्या गोष्टी आम्ही काही क्षणांमध्येच अनुभवतो. आम्हाला झोप मिळत नाही, पण आमचं मन प्रेमाने पूर्णपणे भरलं आहे.
विराटने 11 जानेवारी रोजी बाबा झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांनी दिली होती. वडील झाल्यानंतर गोड बातमी सांगताना विराट कोहलीने लिहिले की, ‘हे सांगताना आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या घरी मुलीचे आगमन झालं आहे. आम्ही तुमच्या प्रेम आणि शुभेच्छाबद्दल आभारी आहोत. अनुष्का आणि मुलगी दोघेही ठीक आहेत.”