काँग्रेसचा एका राज्या पाठोपाठ एक पराभवामुळे पक्षावर उघडपणे टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होता.त्यांनी केरळमध्ये केलेल्या वक्तव्यार भाजपने केलेल्या तिखट हल्ल्यावरुन त्यांनी राहुल गांधींचा बचाव केला. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की, मतदारांच्या समजेचा सन्मान केला पाहिजे. कारण त्यांना माहितेय की कोणाला मत द्यायचंय आणि का द्यायचंय.
राहुल गांधी यांनी केरळ विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान म्हटलं होतं की, गेल्या 15 वर्षात मी उत्तर प्रदेशमधून खासदार राहिलो. मी याठिकाणी वेगळ्या प्रकारच्या राजनीतीचा भाग बनलो होतो. केरळमध्ये येणं माझ्यासाठी उत्साहवर्धक होतं. कारण, मला जाणवलं की येथील लोक मुद्द्यामध्ये रस घेतात. येथील लोकांची समज वेगळी आहे, त्यामुळे याठिकाणचं राजकारण वेगळे आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपने निशाणा साधला होता.
राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर अधिक चांगल्यारितीने स्पष्टीकरण देऊ शकतील. पण, काँग्रेस फूट पाडा आणि राज्य करा या नीतीवर चालणारा पक्ष आहे, असा दावा भाजपने करणे हास्यास्पद असल्याचं कपिल सिब्बल म्हणाले.