शहरातील संत गाडगे बाबा पुतळ्याच्या सौंदर्यीकरणास सुरुवात

74

कारंजा शहरातील बजरंगपेठ परिसरातील संत गाडगे बाबा यांच्या पुतळा परिसरातील सौंदर्यीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. कारंजातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या संत गाडगे बाबा विचारमंच बहूऊद्देशी संस्थेच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले आहे.

बजरंगपेठ येथील संत गाडगे महाराज पुतळा परिसराचे सौंदर्यीकरणाची मागणी संत गाडगे बाबा विचारमंच या संस्थेने लाऊन धरली होती. अखेर संस्थेच्या मागणीस प्राधान्य देत नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनी सौंदर्यीकरणाच्या कामास मंजुरात दिली. शेषराव ढोके यांच्याचहस्ते या कामाचे भूमिपुजन करण्यात आले होते. आता या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

संत गाडगे बाबा विचारमंच बहूऊद्देशीय संस्था कारंजा शहरातील सामाजिक कार्यात नेहमिच अग्रेसर असते. शहरातील गाडगे बाबांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण व्हावे ही संस्थेची तीव्र ईच्छा होती. परिणामी त्यांनी तसे प्रयत्नसुद्धा सुरु केले अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.

नगराध्यक्ष शेषराव ढोके, नगरसेवक प्रसन्ना पळसकर, ईंजिनीयर बाळासाहेब देशमुख आणि पप्पु चांदुकरकर यांचे या कामाकरिता मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंगडे यांनी व्यक्त केले. तसेच रोहित देशमुख, भारत सांडगे, सुरेश तिडके, सचिन कोळसकर यांनी या कामाकरिता विशेष परिश्रम घेतल्याचेसुद्धा सांगीतले.