“प्रत्येक महान पुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही”; ‘या’ राष्ट्रवादीच्या नेत्याची मुंडेंना कोपरखळी

205

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं होतं. या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आत्तापर्यंत धनंजय मुंडे प्रकरणी अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदाराने अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडेंना कोपरखळी मारली आहे. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुंडे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

‘प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली आहे. अर्थात हे विधान करताना श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेण्याचं टाळलं आहे.