शेवटपर्यंत लढला तो….

38

अनिल / वर्तमान

बॉर्डर-गावस्कर मालिका जरी भारताने गमावली असली तरी “जसप्रीत बुमराहचं” कौतुक सगळीकडे होताना दिसत आहे. मालिका जिंकली ऑस्ट्रेलिया संघाने जिंकली असली तरी “मालिकाविराचा खिताब” मात्र “बुमराह” ला मिळाला जे अगदी योग्य आहे, कारण संपूर्ण मालिकेमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीने दरारा निर्माण केला होता.

या मालिकेत त्याने 13.06 च्या सरासरीने एकूण “32 गडी” बाद केले , एका भारतीय गोलंदाजाकडून परदेशी जमिनीवर एका मालिकेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा “विक्रम” त्याने आपल्या नावे केला, यापूर्वी हा विक्रम बिषनसिंग बेदी यांच्या नवे होता त्यांनी एका मालिकेत “31 गडी” बाद केले होते.

शेवटच्या सामन्यात दुसऱ्या इनिंग मधे बुमराह ने गोलंदाजी केली नाही यावर ऑस्ट्रेलियाचा “उस्मान ख्वाजा” म्हणत होता की ” बुमराह गोलंदाजी करणार नाही ही बातमी ऐकताच आमच्या संघाने सुटकेचा श्वास घेतला”…, कारण अख्ख्या मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना हैराण केलं होत आणि “सिडनी ची खेळपट्टी” गोलंदाजांसाठी “नंदनवन” होतीच त्यामुळे बुमराह ने “चौथ्या इनिंग” मध्ये गोलंदाजी केली असती तर कदाचित सामन्याचा “निकाल” ही वेगळा असता आणि “मालिका” 2-2 ने बरोबरीत सुटली असती.

मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली पण खरा हिरो मात्र जसप्रीत बुमराह ठरला, त्याच्या गोलंदाजीच्या कौशल्याने त्याने या मालिकेत आपला ठसा उमटवला आणि शेवटपर्यंत लढला……