मागील साडेचार महिन्यांपासून शेतकरी दिल्ली सिमांवर नविन कृषी काय्द्याच्याविरोधात आंदोलन करत आहे. हरियाणा, पंजाब , राजस्थान, ऊ.प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणात महापंचायतींचे आयोजन करुन आंदोलनाला अधिक बळकट केले जात आहे. मात्र आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी आता आणखी मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे आगामि काळात होऊ घातलेल्या चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश राज्यांतील निवडणुकांत भाजपला नुकसान होणार असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.
भाजप आंदोलनाला योग्य प्रतिसाद देत नसल्यामुळे येणार्या निवडणुकांमध्ये शेतकरी संघटना भाजपविरोधी प्रचार करणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनांकडून केली जात अाहे. संयुक्त किसान मोर्चा आंदोलनाला अधिक मजबुत करण्यासाठी संपूर्ण देशभरात प्रयत्नशील झाला आहे. अशांतच निवडणुकींमध्ये मोठ्याप्रमाणात शेतकर्यांना आपल्याकडे वळवण्यात संयुक्त किसान मोर्चाला यश आले तर भाजपसाठी नक्कीच ही मोठी अडचण ठरणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
पं. बंगाल, तामिळनाडू, आसाम , केरळ आणि पड्डुचेरी या राज्यांमध्ये पुढच्या महिन्यापासून निवडणुकींचे पडघम वाजणार आहेत. हे पाचही राज्य भापसाठी महत्वाची आहेत. या राज्यांमध्ये सत्तास्थापन करण्यासाठी भाजप पूर्ण शक्तीनिशी मैदानात ऊतरला आहे. परंतू शेतकर्यांच्या या आवाहनासाठी भाजप काय रणनिती आखणार? यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पाचही राज्यांसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधनी करत आहे. कॉंग्रेसनेसुद्धा सानर्थ्यानिशी मैदानात ऊतरली आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीवरुन आसाम वगळता ईतर राज्यांमध्ये भाजपच बाजी मारणार असल्याचे संकते वर्तवण्यात येत आहे. पं.बंगालमध्येसुद्धा भाजपसाठी सोपे दिसत असले तरि ईथे काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. यामध्येच शेतकर्यांच्या या घोषणेचा निवडणुकीवर किती परिणाम होईल? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.