मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का; दिग्गज नेत्याचा भाजपल रामराम

10

मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माझी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. गायकवाड यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र, भाजपने शिरीष बोराळकर यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गायकवाड नाराज होते. भाजपमध्ये उपेक्षा होत असल्याचं कारण देत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे भाजप मधील अन्य इच्छकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यातच जयसिंगराव गायकवाड हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे पक्षात झालेली उपेक्षा जिव्हारी लागली असल्याने त्यांनी पक्षाला रामराम ठोकळा असल्याचं बोललं जातंय. जयसिंगराव गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाडयात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणं भाजपला महाग पडणार असल्याचं सांगितलं जातंय.