पं.बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का! सोसावे लागू शकते मोठे नुकसान

36

देशभरात पाच विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. यापैकी पं.बंगालमधील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे तर भाजपसमोर आव्हान बनून ऊभ्या असणार्‍या मनता बॅनर्जींसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. यातच भाजपचे माजी केंद्रिय मंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनी तृणमुलमध्ये प्रवेश केला आहे. भाजपसाठी हे मोठे नुकसान असल्याचे बोलले जात आहे.

यशवंत सिन्हा हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील अर्थमंत्री तसेच परदेशमंत्री होते. शनिवारी सकाळी त्यांनी कोलकत्यात तृणमुल कॉंग्रेसचे सदस्यत्व स्विकारले आहे.

भाजपने तृणमुलच्या बड्या नेत्यांना सामावुन घेत तृणमुल कॉंग्रेसला खिळखिळी करण्याचा कार्यक्रम चालवला होता. यादरम्यान तृणमुलचे महत्वाचे नेते मानले जाणारे सुवेंदु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुवेंदु अधिकारी आणि काही खासदारांची पक्षाला सोडचिठ्ठी हा मनता दिदींसाठी चिंतेचा विषय ठरला होता. मात्र आता यशवंत सिन्हा ही पोकळी भरुन काढण्यास बर्‍यापैकी कारणीभुत ठरु शकतात.

अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील भाजप आणि आताची भाजप यामध्ये खुप फरक आहे, असे यशवंत सिन्हा वारंवार म्हणायचे. पंतप्रधान मोदींच्या अनेक धोरणांवर त्यांनी जाहीर टीका केली आहे. भाजपचा राजिनामा दिल्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून लांब होते. परंतू अचानक त्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर तृणमुलचा हात धरला आहे. तृणमुल कॉंग्रेससाठी हे नक्कीच फायद्याचे ठरणार आहे, असे बंगालच्या राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.