सीबीएसईने अकरावीला गणित विषयाची निवड करण्याविषयीच्या नियमामधून सूट दिली आहे. ही सूट केवळ यावर्षीच लागू असेल. सीबीएसईनं 2019 मध्ये एक नियम लागू केला होता. त्यानियमाप्रमाणं दहावीला ज्या विद्यार्थ्यांनी स्टँडर्ड गणित विषयाची निवड केली असेल.
बेसिक गणित विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणं मॅथ्स शिकायचा असल्यास परीक्षा देण्याचा नियम आहे.दहावीनंतर एखाद्या विद्यार्थ्याला मॅथ्स विषय निवडायचा असल्यास त्यांना 10 वीची कंपार्टमेंट परीक्षा द्यावी लागत असे.
सीबीएसईनं दहावीला बेसिक मॅथ्स विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला मॅथ्स शिकण्याची संधी मिळेल, असं म्हटलं आहे.सीबीएसईच्या निर्णयामुळे दहावीला स्टँडर्ड मॅथ्स या विषयाची निवड केली नसली तरी अकरावीला मॅथ्स विषयाची निवड करता येणार आहे.