परिक्षांबाबत पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

13

पुणे विद्यापीठाची परीक्षा ही 15 मार्चपासूनच सुरु होणार होती. मात्र एजन्सी निवडण्याची प्रक्रिया चुकल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली. त्यानुसार आता येत्या 15 एप्रिलपासून ही परीक्षा होणार आहे.

तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेत व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार आहे. यापूर्वी सोडवलेली उत्तरे सेव्ह करुन खंड पडल्यास तिथून परीक्षा पुन्हा सुरु होईल. परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी उपलब्ध करुन दिली जाईल.

प्रथम सत्र वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, एम.एड.,एम.पी.एड, बीएस्सी -बी.एड., बी.ए- बी.एड या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संबंधित अभ्यास मंडळाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.

प्रथम सत्राच्या परीक्षांना येत्या 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या परीक्षा रविवारी देखील घेण्याचा मोठा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. याबाबतची सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रसिद्ध केली आहे.