दहावी बारावी परिक्षेसंदर्भात मोठा निर्णय !

31

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येचा आलेख दिवसागणिक वाढतो आहे. परिणामी दहावी-बारावीच्या परिक्षासंर्भात विद्यार्थी आणि पालक यांमध्ये संभ्रमाचे वातवरण निर्माण झाले आहे. परंतू शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परिक्षा अॉफलाईनच होणार असा निर्णय जाहीर करत परिक्षेसंदर्भातील अनेक बाबीमध्ये विद्यार्थ्यांना सुट दिली आहे.

कोरोना संसर्गाचा प्रभाव जोमाने होतो आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात रात्र संचारबंदी, संचारबंदी आणि कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. विद्यालये माविद्यालयांनासुद्धा स्थानिक प्रशासनाने बंदचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमिवर दहावी आणि बारावीची परिक्षा अॉफलाईन होणार की अॉनलाईन अशाप्रकारे संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर वर्षा गायकवाड यांनी अॉफलाईन परिक्षेचा निर्णय जाहीर करुन विद्यार्थ्यांना सुविधा प्राप्त करुन दिल्या आहेत.

तोंडी परिक्षा ही लेखी परिक्षेनंतर घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेखी परिक्षेमध्ये यापुर्वी विद्यार्थ्यांना तीन तासाचा वेळ होता. आता यामध्ये अर्धा तास वाढवुन देण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती असणार आहे.

बहुतांश पालकांकडून परिक्षा अॉनलाईन घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र दहावी आणि बारावी बोर्डाची परिक्षा अॉनलाईन घेणे शक्य नाही असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी अॉनलाईन परिक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.