‘Bigg Boss’ फेम अभिजीत बिचुकले पुणे पदवीधर मतदारसंघाच्या रिंगणात

3

‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत अशी चर्चा सुरु आहे. राजकारण, साहित्य आणि कला अशा अनेक क्षेत्रात कामगिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ नेहमी आपल्या अनोख्या अंदाजमुळे चर्चेत असतात. राष्ट्रपती पदाची निवडणूक असेल किंवा लोकसभा, विधानसभा निवडणुक असेल त्यामध्ये ते पुढाकार घेत रहातात. परंतु नेहमी ते अपयशी होतात. यावेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बिचुकले यांनी शनिवारी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बिचुकलेंच्या नावाची चर्चा पुन्हा रंगली आहे.

राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंम्बर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. 3 डिसेंम्बर रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यापूर्वी अभिजित बिचुकले यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या विरोधातही निवडणूक लढवली होती. तसेच विधानसभेच्या निवडणूकीत त्यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदानसंघातून आव्हान दिलं होतं. परंतु तिथेही ते अपयशी ठरले. त्यांचे डिपॉझिट देखील जप्त करण्यात आले होते.

अभिजित बिचुकले म्हणतात, माझे चाहते मला नेहमीच मोठा पाठींबा देत असतात. परंतु पैसा आणि ताकदीच्या पुढे माझी चिकाटी कमी पडते. त्यामुळे माझा पराभव होत आला आहे. आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदारांनी माझा गांभीयाने विचार करावा. मी शिक्षण आणि नोकऱ्यांना प्राधान्य देणार आहे. मला एकदा संधी देऊन बघावी. असे बिचुकले यांनी म्हंटले आहे.