‘बिग बॉस 14’ च्या घरात चर्चेतील स्पर्धक राहुल वैद्य याने अभिनेत्री दिशा परमार हिला नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज केला होता. दिशा आणि राहुल यांच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली आहे. दिशानेही लग्नाला होकार दिला आहे. बिग बॉसच्या घरात राहुलने जाहीरपणे आपले प्रेम कबुल केले होते.
अखेर त्यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला असून त्याच्या आईने गीता वैद्य यांनी एका मुलाखतीत लग्नाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, जून महिन्यात दोघे लग्नाच्या बेडीत अडकू शकतात. स्पॉटब्वॉयशी बोलताना गीता वैद्य म्हणाल्या, “आम्ही लग्नाची जूनसाठी तयारी करतो आहोत. अद्याप लग्नाची तारीख निश्चित केलेली नाही, कारण राहुल एकदा बिग बॉसमधून बाहेर आला की मग यावर त्याचा सल्ला घेऊ.
राहुलच्या कुटुंबीयांनी दिशाच्या आई-वडिलांची भेट घेतली आहे. ते अत्यंत छान कुटुंब असल्याचे राहुलची आई गीता वैद्य यांनी म्हटले आहे. दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. ‘प्यार का दर्द’ या टीव्ही शोमध्ये दिशाने काम केले आहे. दिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती. या व्हिडीओनंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दिशा टीव्ही सीरियल ‘ती अपना सा’मध्ये दिसली होती.