प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनानं झाले निधन!

7


पुणे : सध्या संपूर्ण देशभसरात कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच देशभरात मोठया संख्याने रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्र सरकारच्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे. आज अनेक कलाकार, राजकीय पुढारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोरोनाची लागण झल्याचे समोर आले होते तसेच अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला होता. त्यातच आता अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे.


बिक्रमजीत कंवरपाल यांचे ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी या संदर्भात माहिती देत अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. आज सकाळी कोरोनामुळे अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते. त्यांनी बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांना मनापासून संवदेना, असं ट्विट अशोक पंडित यांनी केलंय.


बिक्रमजीत कंवरपाल २००२ साली मेजरच्या पदावरून सेवानिवृत्त झाले. यानंतर २००३ मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पेज ३, रॉकेट सिंग, आरक्षण, मर्डर २, २ स्टेट्स आणि गाझी अॅटॅकसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनावर अंकेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.