सध्या महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकासुद्धा जोर धरत आहेत. अनेक निर्णय यांमध्ये घेतले जात आहेत. अशांतच कोकणासाठी महत्वाचा मानला जाणारा रत्नागिरी-राजापुर रीफायनरी प्रकल्प कोकणासाठी पर्यायाने महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा असलल्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. कोकणाचे भविष्य सुकर बनवण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून जाणे महाराष्ट्राला परवडण्यासारखे नसल्याचे त्यांच्या पत्रातून व्यक्त केले आहे. तर राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे भाजपकडून कौतुक होते आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहीले आहे. ज्यामध्ये नाणार प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून जाऊ नये अशी भूमिका घेतली आहे.
भाजपने राज ठाकरेंच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. राज ठाकरेंची ही भूमिका योग्य आहे आणि राजकारणाच्या पलीकडली आहे. असे मोठे प्रकल्प राज्याच्या विकासांत महत्वाची भूमिका निभावणारे ठरतील. राज ठाकरेंचा हा विचार महाराष्ट्राका शक्तीशाली करण्याचा आहे. ऊद्धव ठाकरेंनी या प्रकल्पाला परवानगी द्यावी असे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. दरम्यान मुनगंटीवारंच्या या विधानानंतर भाजप मनसेच सुत जुळतयं का अशा चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात रंगायला लागल्या आहेत.
कोकणातील स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध होत असल्यामुळे ऊद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र राज ठाकरे कोकणातील सामर्थ्याचे कौतुक करत तसेच कोकणातील बेरोजगारीसारख्या समस्या मांडत या प्रकल्पाच्या आवश्यकतेविषयीचे स्पष्टीकरण आपल्या पत्रात दिले आहे.